दत्तजयंती

महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या श्रीदत्ताची सर्वसामान्य भक्त दर गुरुवारी अतिशय भक्तिभावाने पूजा व आरती करताना आढळतात . इतकेच नाही तर वर्षभरातून निदान एकदा तरी एखाद्या दत्त स्थानाची यात्रा करून येतात .अत्री ऋषी आणि सती अनसूया यांच्या पोटी जन्मलेल्या श्रीदत्तात्रेय यांना तिन्ही देवांचा अंश म्हणून त्रिगुणात्मकता लाभली . श्रीदत्तगुरू हे नाथपंथीयांचे अधर्व्यू असले तरी महाराष्ट्रातील महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायही त्यांना गुरुस्थानी मानतो . काही जण त्रिमुखी दत्ताची तर काही एकमुखी दत्ताची उपासना करतात . औदुंबराच्या तळवटी दत्ताचा वास असतो व ते नित्य काशी , करवीर आणि माहूर असे त्रिस्थळी भ्रमण करतात असे मानले जाते . अलीकडच्या काळात श्रीपाद वल्लभ , नरसिंह सरस्वती , अक्कलकोट स्वामी , माणिक प्रभू यांना दत्तावतार समजून भक्त त्यांची पूजा करतात .

मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तजयंतीचा उत्सव साजरा करतात . कुरवपुर , गाणगापूर , नरसोबाची वाडी , औदुंबर , अक्कलकोट , कारंजे , गिरनार , माहूर , पांचाळेश्वर या दत्तस्थानी लाखो दत्त भक्त या दिवशी दत्तजयंतीचा उत्सव साजरा करतात . काही कुटुंबात दत्ताचे नवरात्रही पाळले जाते . दत्तजन्मापुर्वी एक आठवडा गुरु चरित्राच पारायण अनेक भक्त करतात . हा सोहळा सायंकाळी साजरा करतात .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu