सर्वनाम

नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
मराठीतील प्रमुख सर्वनामे :

मी , आम्ही , तू, तुम्ही , तो , ती ,ते, त्या , हा , जो,कोण, काय , स्वत:, आपण …

सर्वनामाचे मुख्य ६ प्रकार आहेत
१. पुरुषवाचक सर्वनाम :
२. दर्शक सर्वनाम : कोणतीही जवळची अथवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी दर्शक सर्वनामांचा उपयोग करतात. उदा : हा, ही, हे, तो ,ती ,ते
३. संबंधी सर्वनाम :
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदा. जो, जी, जे ,ज्या
४. प्रश्नार्थक सर्वनाम : ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी उपयोग होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. उदा. कोण, कोणास, काय, कोणी,
५. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
६. आत्मवाचक सर्वनाम : आपण ,स्वत: याना आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu