Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
पैठणी पासून बनलेल्या चपला आता खास नववधूसाठी…
लग्नसराई लेख

पैठणी पासून बनलेल्या चपला आता खास नववधूसाठी…

paithani chappalपैठणी नेसणं हे सर्व महिलांसाठी एखाद्या आभूषणाइतकंच महत्त्वाचं असतं. याच पैठणीच्या रॉ मटेरिअलपासून अनेक वस्तू आता तयार होऊ लागल्या आहेत. पैठणीच्या पर्स, ड्रेस मटेरियल, मोबाईल पाकिट आपण पाहिलंच असेल, मात्र आता पैठणीच्या कपड्यापासून विविध डिझाईनच्या चप्पल तयार करण्यात आल्या आहेत.

येवल्यातील पैठणी ही जगभरात प्रसिद्ध असल्याने इथे खरेदीसाठी महिलांची गर्दी होत असते. येवल्यातील पैठणी विणकरांना फारसा मोबदला मिळत नाही. त्यामुळे पैठणी विणकर कोष्टी समाजाने आपली अस्तित्त्व टिकवण्यासाठी वेगळा मार्ग निवडला आहे. पैठणी विणकाम करताना, उरलेल्या कपड्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायला सुरुवात केली. आधी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ड्रेस मटेरिअल आणि ड्रेस तयार केले. त्यानंतर मनी पर्स तयार करण्यात आल्या. इतकंच नाही तर बाहुला-बाहुलीसाठी ड्रेस, मोबाईल पाऊच तयार करण्यात आले.


केवळ पैठणी विणण्यामुळे हाती फारसं मिळत नसल्याने काही तरी नवीन करावं, अशी संकल्पना मनात आली आणि त्यातून पुढे आले ते पैठणीच्या उरलेल्या कपड्यापासून चप्पल करण्याची कल्पना. कोल्हापुरी चप्पलची जशी महाराष्ट्रात ख्याती आहे, तशी पैठणीची चप्पल का होऊ शकत नाही आणि प्रथमिक स्तरावर पैठणीच्य चप्पलची निर्मिती करण्यात आली.
लग्नात नववधू पैठणी हमखास घालते, मग त्यावर पैठणीच्या कापडापासून विविध डिझाईन असलेली चप्पल घातली तर एक वेगळा ट्रेंड कोष्टी समाजाने सुरुवात केला. ही चप्पल तयार करण्यासाठी ६०० रुपयांपासून पुढे खर्च येत असल्याचं पैठणी विणकर सांगतात.
एकुणच पैठणीपासून वेगवेगळे प्रॉडक्ट तयार झाले असले तरी पैठणीच्या कापडापासून प्रथमच चप्पल प्रथमच तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नववधू, सेलिब्रेटींसाठी ही चप्पल नक्कीच आर्कषण ठरणार आहे.

 

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla