Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
संकष्ट चतुर्थीचे व्रत
Vratavaikalye

संकष्ट चतुर्थीचे व्रत

हे व्रत खूप लोकप्रिय व्रत असून लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत अनेक स्त्री पुरुष हे व्रत नित्य नेमाने व श्रद्धेने करतात . दर महिन्याची वद्य चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी होय .या दिवशी उपवास करतात . ज्यांना उपवास झेपत नाही ते फलाहार घेतात . रात्री स्नान करून गणेशपूजा करून त्यास २१ मोदकांचा नैवेद्य दाखवतात . गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचे लाल फुल त्यावेळी अवश्य वहावे . गणपतीची मनोभावे पूजा करून गणेश स्त्रोत्र म्हणावे . काही जण देवळात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात . चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन करून साध जेवण करून उपवास सोडतात . ज्यांना वेळ असतो ते संध्याकाळी श्रीगणेशाची षोडशोपचारे पूजा करतात . अथर्वशीर्षाने अभिषेक करतात .

या व्रताचे अनेक फायदे आहेत . विघ्नहर्त्या गणेशाच्या कृपेने आपल्या जीवनातील संकटे दूर होतात व आपली बुद्धीही स्थिर राहते . कुटुंबातील मुलांनाही त्यामुळे विद्यार्जनास व आकलन शक्तीस खूप मदत मिळते . मंगळवारी येणाऱ्या संकष्टीस अंगारक चतुर्थी म्हणतात . काहीजण केवळ अंगारिका चतुर्थीच करतात . काहीजण मात्र दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीच व्रत करतात . हे व्रत मात्र अहोरात्रीचे असल्याने या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा लागतो . भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीस महासिद्धी विनायकी चतुर्थी असे म्हणतात .

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla