Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
चंपाषष्ठी
Utsav

चंपाषष्ठी

jejuri- champashashtiमार्गशीर्ष शुद्ध षष्ठिस चंपाषष्ठी म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असा सहा दिवसांचा काळ महाराष्ट्रात मार्तंडभैरवाचे म्हणजे खंडोबाचे नवरात्र म्हणून साजरा करतात . जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो. चंपाषष्ठीच्या दिवशी या नवरात्राची सांगता होते. कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये कुंभ अथवा टाक ठेवून खंडोबाला प्रिय असलेली झेंडूची फुले अथवा माळा खंडोबाला वाहतात . पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे वाढवीत सहाव्या दिवशी सहा फुलांच्या माळा त्याला घालतात.

षष्ठीला तळई व आरती करून हे नवरात्र उठवितात. महानैवेद्यात वांग्याचे भरीत, रोडगा आणि कांद्याची पात यांचा समावेश आवश्यक असतो. खंडोबावरून नारळ ओवाळून, फोडून, त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वांना देतात. तळी भरताना व आरतीच्या वेळी ‘खंडोबाचा येळकोट’ असे म्हणतात. चातुर्मास्यात निषिद्ध मानलेले कांदे, लसूण इ. पदार्थांची या दिवसापासून खाण्यास सुरुवात केली जाते .भाद्रपद शुद्ध षष्ठीस मंगळवार, विशाखा नक्षत्र व वैधृतियोग येत असेल, तर तिलाही चंपाषष्ठी म्हणतात. सुमारे तीस वर्षांनी एकदा अशी चंपाषष्ठी येते. उपवास, सुर्यपूजा व शिवलिंगदर्शन या दिवशी करावे असे शास्त्रात सांगितले आहे.

 

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla