Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
दिवाळीचा फराळ
खाऊगल्ली लेख

आली दिवाळी ताट सजवू फराळांनी  

फराळाच्या पारंपारिक कृतींच महत्व जराही कमी झालेले नाही परंतु तरीही त्या कृतींना आधुनिकतेची जोड देऊन हे चवींच फ्युजन देखील लोकप्रिय होत आहे.
दिवाळीच्या फराळाच्या अशाच काही नाविन्य पूर्ण पाककृती .....

besan-ladduबेसनाचे लाडू:
साहित्य : बेसन २ वाट्या , अर्धी वाटी बारीक रवा , अडीच वाट्या पिठी साखर, वेलची पूड , काजू काप, बदाम काप, मनुका, बेदाणे व साजूक तूप.
कृती : बेसन तुपात छान भाजून घ्यावे, भाजल्यावर छान खमंग वास आला पाहिजे, रवा  सुद्धा छान भाजून घ्यावा.राव व बेसन छान एकत्र करावे व थोडेसे कोमात होऊ द्यावे.मग पिठी साखर घालून छान मळावे. नंतर वेलचीपूड ,काजू काप , मनुका, बेदाणे टाकून छान बारीक लाडू वळावेत.

झटपट  लाडू :
साहित्य : १ ते दीड वाटी बारीक रवा , १ वाटी ओले खोबरे, १ ते अडीच वाट्या साखर , जायफळ पूड, काजू , किसमिस , १ कप साई सकट दुध.
कृती : राव गॅस वर नुसताच भाजा. रव्यात खोबरे, साखर व सायीचे दुध घालून चांगले हलवून मंद गॅस वर शिजायला ठेवा. मधून हलवत राहा.घट्ट होत आले की त्यात एक चमचा जायफळ पूड ,काजू किसमिस घाला. मिक्ष करून लाडू वळा.

karanji 1ओल्या नारळाच्या करंज्या :
साहित्य : एक नारळ खवलेला, एक वाटी भरून साखर, वेलदोडा पूड, एक वाटी मैदा, वनस्पती तूप , चवीसाठी मीठ.
कृती : नारळ व साखर यांचे मिश्रण  गॅसवर ठेवावे व सारखे हलवत राहावे.मिश्रण एकजीव होऊन घट्ट गोळा झाल्यावर वेलचीपूड टाकून खाली उतरवावे.मैदा चाळून घेणे , एक चमचा तूप गरम करून मोहनासाठी मैद्यात टाकणे.चिमुटभर मीठ टाकून लगेच मळण्यास घ्यावे. पीठ घट्टच मळावे. लगेच छोट्या छोट्या गोळ्या करून लाट्या लाटणे व सारण भरून करंज्या करणे. करंज्या तुपातच तळाव्यात.जरा गुलाबीसर ठेवाव्यात. छान खुसखुशीत लागतात.  

खुसखुशीत  शंकरपाळे :
साहित्य : १ वाटी दुध, १ वाटी तूप, १ ते दीड वाटी साखर , मीठ , मैदा , तळण्यासाठी तेल.
कृती : १ वाटी दुध, तूप ,साखर , किंचित मीठ घालून उकळा. त्यात मावेल एवढा मैदा घाला. चांगले मळून थंड झाल्यावर पोळी लाटून त्रिकोणी वा चौकोनी आकारात शंकरपाळे कापून तेलात टाळून काढा.

चकलीची भाजणी

साहित्य :
१ किलो तांदूळ , अर्धा किलो चणाडाळ , पाव किलो उडीद डाळ, १००  ग्रॅम मुगडाळ, ७५ ग्रॅम तुरडाळ , एक मुठ साबुदाणे, १ मुठ  पोहे , १ मुठ धणे, एक मुठ जिरे सगळे वेगवेगळे भाजून पुन्हा एकत्र करून थोडे भाजा. आणि दळून आणा.
कृती :
जेवढ्या वाट्या पीठ तेवेढेच पाणी उकळत ठेवा , उकळत्या पाण्यात हळद ,  तीळ, तिखट , मीठ ,खसखस  आणि ३-४ चमचे तेल एकत्र टाकून ते उकळल्यावर त्यात भाजणी टाकून गस बंद करा . वर झाकण ठेवा. ते थोड कोमट असतानाच मळून घ्या.सोऱ्याच्या सहाय्याने छान चकल्या पाडा व तेल चांगले तापवून त्यात छान कुरकुरीत  तळा.



आपल्या जवळ जर उत्तम साहित्य, लेख, कविता, छायाचित्रे, पाककृती असतील ज्यांना मुंबईपुणेऑन लाईन.कॉम (www .mumbaipuneonline .com   वर   प्रसिद्धि मीळू शकेल अशी आपणांस खात्री आहे, अशी माहीती आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही ती माहीती आपल्या नावासह प्रसिध्द करू.

संबधित लेख- 1. " खादयसंस्कृती अस्सल मुंबईकरांची .....अस्सल मुंबईची"
2. 'फूड कोर्ट -उपवासाचे चटकमटक'
3.
बाप्पाचा आवडता नैवेद्य - मोदक


तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.
संपर्क  :Email :
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

साहित्य, लिखाण अथवा छायाचित्रे ई-मेल ने पाठवायची असल्यास townmumbai @gmail .com   या पत्त्यावर पाठवावे.

 

 

 

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla