Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मुले आणि अभ्यास
विद्यानगरी लेख

मुले आणि अभ्यास

kid-doing-homework* मुलांना शिकवा वेळेचे नियोजन -
अभ्यासासाठी दिलेल्या वेळात पुन्हा निरनिराळ्या विषयांसाठी ठराविक वेळ द्यावयास हवा. जो विषय कठीण वाटत असेल त्याला अधिक वेळ द्या.वेळापत्रक तयार करताना महत्वाच्या गोष्टींसाठी प्रथम व अधिक वेळ द्यायला हवा.प्रत्येकाची कार्यक्षमतेची वेळ निरनिराळी असू शकते.कुणी सकाळी अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकेल तर कुणी संध्याकाळी.जेंव्हा ग्रहण, स्मरण सर्वाधिक चांगले असेल, विचारशक्ती , तर्कशक्ती अत्यंत जागरूक असेल तेंव्हा कल्पकता अधिक बहरू शकेल.तुमच्या मुलाची अशी वेळ कोणती हे त्याच्या /तिच्या मदतीने शोधून काढा आणि महत्वाचे काम अभ्यास या साठी ती वेळ नियुक्त करा. अभ्यास किती वेळ केला यापेक्षा तो कसा केला, त्याचा दर्जा याला अधिक महत्व आहे.विश्रांतीमुळे मन ताजे तवाने रहाते. चांगल्याप्रकारे एकाग्र होऊ शकते.स्मरण, ग्रहण, विचार, तर्क इ. मानसिक शक्ती वाढवतात.आरोग्यासाठी आवश्यक तेवढी झोपही घ्यायला हवी.

Read more...
 
स्टाईलीश वाचन
विद्यानगरी लेख

'स्टाईलीश  वाचन'

j0409270वाचन ही तशी व्यक्तीपरत्वे कमी अधिक आवड (आणि सवड) असणारी बाब. मात्र तरीही प्रत्येक पिढी 'आजकालची मुले वाचतच नाहीत' असे म्हणतच असते. त्याला खरंच नाइलाज आहे. मात्र असे असले तरी आजकालची मुले वाचतच नाहीत ही ओरड काही तितकिशी  खरी नाही. मुले ( इथे मुले आणि मुली या दोन्ही अर्थाने हा शब्द योजला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.) वाचतात, खरच वाचतात.हो त्यांच्या वाचनाची पद्धत वेगळी असू शकते (कदाचित). म्हणजे 'चिंता करतो विश्वाची' असा धीर गंभीर चेहरा करत , आजूबाजूला आपल्या किमान एक पंचमांश वजन भरतील, अशा दोन चार कादंबऱ्या आणि चारशे किंवा अशीच 'काहीशे' पानांची 'जड' कादंबरी दोन्ही हाताने पेलवत , मध्येच नाकावरचा चष्मा तर्जनीने सरळ करत, डुगूडुगू हलणाऱ्या आणि वारा कमी आणि आवाज जास्त करणाऱ्या टेबल फॅनचा वारा खात , आकाशवाणीवरील 'अभी ना जाओ छोडके के दिल अभी भर नही' च्या दर्द भऱ्या गीतात हरवत, एक हात 'इतिहास जमा' झालेल्या खुर्चीत स्वत:ला सावरत, चेहऱ्याचा अर्धा भाग जवळपास त्या कादंबरीने 'खाऊन' टाकलेला आहे, अशा 'प्रेक्षणीय' स्थितीत नसतील(च) वाचत.

Read more...
 
गुंफिते संस्कार फुलांची माला ...
विद्यानगरी लेख

गुंफिते संस्कार फुलांची माला ...

mother-and-baby1अस म्हटलं जात की मुल ही आईच्या पोटात असल्यापासूनच शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात करतात, आणि ते खरच आहे की ! अभिमन्यूने नाही का आईच्या पोटात असतानाच चक्रव्यूह प्रवेशाची प्रक्रिया शिकून घेतली होती. आणि म्हणूनच आज सर्वत्र उपलब्ध असलेल्या गर्भसंस्कार केंद्रात प्रवेश मिळवून आपल्या मुलांना पोटात असल्यापासूनच चांगल्या संस्कारांचे धडे आई देत असल्याचे आपल्याला सर्रास पाहायला मिळते.खरच, मुलांना त्यांची जवाबदारी कळेल आणि ती जवाबदारीने वागतील अशी शिस्त लावणे हे आजच्या काळात खूपच महत्वाचे आहे.मुल स्वतःचे स्थान समाजात स्वतः निर्माण करू शकतील असे संस्कार अतिशय प्रेमाने त्यांच्यावर केले गेले पाहिजेत. असे करण्यात जर पालक यशस्वी झाले, तर मुलांना चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याची गरज भासणार नाही. यशस्वी संगोपनाचे काही मूलमंत्र पालक त्यांच्यासाठी किती जास्तीत जास्त वेळ देऊ शकतात या गोष्टीवर जास्त अवलंबून असतो. 

Read more...
 


Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla