हरतालिका व्रत

हे व्रत स्त्रिया भाद्रपद शु . तृतीयेला करतात . कुमारिका मुली चांगला नवरा मिळावा म्हणून तर विवाहित स्त्रिया आपल्याला अखंड सौभाग्य लाभाव म्हणून हे व्रत करतात व या दिवशी दिवसभर उपवास करतात . विधवा स्त्रियाही या दिवशी केवळ उपवास करून पुढील जन्मी अहेवपण लाभाव म्हणून प्रार्थना करतात .

या व्रतात वाळूची शिवपिंड तयार करून तिची पूजा करतात . अलीकडे मातीच्या मूर्त्याही बाजारात मिळतात . या दिवशी कुमारिका व सुवासिनी मिळून रात्री जागरण करतात . दुसऱ्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखवून मूर्तीचे विसर्जन करतात . काही जणी शंकराच्या देवळात जाऊन तेथे मांडलेल्या हरतालिकेच्या मूर्तीची व शिवपिंडाची पूजा करतात . दुसऱ्या दिवशी उपवास सोडून या व्रताची सांगता करतात .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu