घर सजवताना……..

आपलं घर इतरांपेक्षा आगळंवेगळं दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. बाजारात रोज नव्याने येणाऱ्या सजावटीच्या विविध गोष्टींचा आपण कुशलतेनं वापर करून जरा “हट के’ इंटेरियर केलं तर हे सहज शक्य होतं आणि त्यासाठी फार जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नसते.

कोणत्याही घराचे डिझाईनिंग करताना आधी जागेचा अभ्यास करून संबंधितांना केलेल्या डिझाईनचा अधिकाधिक वापर कसा होईल या दृष्टीने डिझाईन करण्यावर भर दिला जातो. लाइट रचनेपासून रंगसंगतीपर्यंतचा विचार करावा लागतो. घरगुती इंटेरियर व कार्यालयातील इंटेरियर करताना तेथील गरजा, वापर याला प्राधान्य देत डिझाईन करताना प्रयत्न करावे लागतात. अनेक जण वास्तुशास्त्रानुसार घरात इंटेरियरला प्राधान्य देतात. तेव्हा डिझायनरला वास्तुशास्राचे ज्ञान असणेही आवश्यक आहे.

इंटेरियर डिझाईनसाठी संगणकावर थी ड्री मॅक्स, ऑटोकॅड या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. प्रत्येक डिझाईनमध्ये सारखेपणा येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी नेहमी इंटेरियर क्षेत्रातील नवनवीन घडामोडींची माहिती घ्यावी लागते. विचारक्षमता आणि तल्लख बुद्धिमत्ता याची जोड मिळाल्यास कामातील नाविन्य दिसून येते.

इंटेरियरची कामे करताना रोजची इतर कामे सांभाळून वेळेचे मॅनेजमेंट करणेही तितकेच महत्त्वाचे असते. ग्राहकाची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या मागणीनुसार डिझाईन करताना मॅनेजमेंट महत्त्वाचे असते. अवास्तव वास्तुशास्त्राला महत्त्व न देता कमी खर्चात चांगली गुणवत्ता व दर्जेदार काम कुशल कामगाराकडून करून ग्राहकांना समाधान देण्याचा प्रयत्न असतो. प्रयोगशीलतेतून घरे, कार्यालयांची आकर्षक रचना आणि सौंदर्य कसे बहरेल याकडे अधिक कटाक्ष असतो. वास्तुरचना आणि अंतर्गत सजावट (इंटेरियर) हे एकमेकांना पुरक असावे, तसेच त्याची रचना ही आजूबाजूच्या वातावरणाशी समरस कशी होईल याबाबत नेमका विचार करणे आवश्यक आहे.

इंटेरियर डिझायनरची निवड करताना त्याचा त्या क्षेत्रातील अनुभव विचारात घेणे महत्त्वाचे असते. त्याने दिलेल्या कोटेशनवरून त्याची पारख न करता त्याच्या कामाची छायाचित्रे पाहून, जमल्यास त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची गुणवत्ता तपासून पहावी. कारण नवशिके डिझायनर्स कामं मिळवण्यासाठी कायम कमी किमतीचे कोटेशन देणार. पण त्याला भूलून न जाता चांगल्या गोष्टींची पारख असणे जास्त महत्त्वाचे असते.

– केतन निमकर

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क  : Email – thinkmarathi@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu