‘अर्थसंस्कार’

आईवडिलांकडून मुलांवर कळत नकळत संस्कार होत असतात. चांगला आणि यशस्वी माणूस बनण्यासाठी या संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. आधुनिक काळात यात भर पडली आहे ती आर्थिक संस्कारांची, पूर्वीपासून बचतीचे महत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले जाते. पण आता बचतीबरोबर गुंतवणुकीचे महत्व ठसवणे गरजेचे आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर संस्कार आणि शिस्त यांचे संदर्भ बदलत जातात.

लहान मुलांना पाढे, श्लोक मुखोद् गत   होण्यासाठी रोज म्हणायला लावतात तसंच मुलगा जेव्हा शिक्षण संपवून नोकरी किंवा व्यवसायाला सुरुवात करतो तेव्हा तशाच शिस्तीने आणि सातत्याने बचतीची सवय लागणे आवश्यक आहे.

किती गुंतवणूक होते त्यापेक्षा ती गुंतवणूक किती काळ होते हे अधिक महत्वाचे आहे. छोट्याशा बीजापासून सुरुवात केलेली गुंतवणूक वृक्ष कधी बनते ते समजत देखील नाही. सुरुवात मासिक उत्पन्नाच्या एक दशांश रकमेने करावी.
नोकरीला लागल्यावर पहिली गुंतवणूक करावी ती म्हणजे life insurance corporation किंवा L .I .C . मध्ये. याची करणे ,

१. जेवढे कमी वय तेवढा हप्ता  कमी.
२.जेवढे वय लहान तेवढा बचतीचा कालावधी मोठा होऊ शकतो.
३. कमी हप्त्यांमध्ये निवृत्तीच्या वेळी हाती येणारे पैसे अधिक.

स्वत:च्या आयुष्याचा विमा उतरवताना मोठ्या रकमेचा Term Plan घेणे अत्यंत गरजेचे आहे. पण ज्या प्लॅन मध्ये बचतीची सवय लागते त्याचे उदाहरण देते.

समजा ‘प्रणव’  ही व्यक्ती २५ वर्षे वयाची असून व्यवसायाने Software  Engineer  आहे. मासिक उत्पन्न ५००००/-. म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे महिना ५०००/- इतकी रक्कम L .I .C . च्या Jeevan Saral (जीवन सरल) या  प्लॅनमध्ये गुंतवायला सुरुवात केली. प्रणवचे निवृत्तीचे वय असेल ६० वर्षे तर तो ३५ वर्षे गुंतवणूक करू शकतो.

त्यामध्ये त्याला विमा मिळतो १२,५०,००० इतका ,म्हणजेच जर त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला १२,५०,०००/- इतकी रक्कम मिळेल. जर अपघाती मृत्यू झाल्यास २५,००,०००/- * मिळतात. ( * यासाठी फक्त १००/- रु. अधिक भरून हा फायदा घेता येतो.)
उदाहरणातील व्यक्तीला ६० व्या वर्षी अंदाजे १ करोड १५ लाख इतकी रक्कम (करमुक्त) मिळेल.
भरलेल्या हप्त्यांवर दरवर्षी आयकरात सूट मिळेल. दहा वर्षांनी कधीही गरज पडल्यास भरलेले पैसे काढून घेता येतात. यामध्ये व्यक्तीचे उत्पन्न दरवर्षी वाढत जाईल आणि त्याला दरमहा हप्ता जाणवेनासा होईल.
स्वत:चा विमा दर काही वर्षांनी पडताळून पहाणे गरजेचे आहे. वेळोवेळी विमा वाढवायची गरज असते. विमा साधारणपणे कधी वाढवावा ,
१. जेव्हा स्वत:चे उत्पन्न वाढेल तेव्हा.
२.जेव्हा आपल्यावरील जबाबदारी वाढते.(उदा. लग्न, अपत्यप्राप्ती वगैरे)
३. जेव्हा गृहकार्जासारखे मोठे कर्ज घ्यावे लागेल.
शिस्त आणि निगुतीने केलेली बचत आणि दूरदृष्टी व संयमाने केलेली गुतंवणूक म्हणजेच अर्थसंस्कार होय.

 

-सौ.जान्हवी  मनोज साठे
Investment & Insurance Consultant
9820438968

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu